भारतामध्ये पार्सले म्हणजे ओवा ची शेती कशी करावी याविषयी संपूर्ण मार्गदर्शन.
Bhartat Parsley chi Sheti Kashi Karavi: पार्सले ज्याला भारतामध्ये ओवा देखील म्हटले जाते हा घटक स्वयंपाकात वापरला जाणारा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. युरोप सारख्या देशांमध्ये पार्सले हा पदार्थ जेवणात मोठ्या प्रमाणात वापरला जातो त्यामुळे याची मागणी खूपच असते चला तर जाणून घेऊया भारतामध्ये याची शेती कशाप्रकारे करता येईल आणि यातून तुम्ही कसे उत्पन्न मिळू शकतात याविषयी माहिती.
पार्सल आहे ज्याला ओवा देखील म्हटले जाते हा एक सुगंधी पानांसाठी उगवलेली वनस्पती आहे. ही औषधी वनस्पती देखील आहे. ही वनस्पती किंवा शेती थंड हवेच्या ठिकाणी उगवली जाते. भारतात पार्स्लेची शेती करता येऊ शकते.
हवामान: पार्सले शेती करण्यासाठी थंड हवेचे ठिकाण आवश्यक असते येथील तापमान 15 ते 20 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असावे लागते. हिवाळ्याच्या महिन्यात मैदानी प्रदेशात आणि वर्षभर डोंगरात भागात याचे उत्पादन घेतले जाऊ शकते.
माती: पार्सल हे शेतीसाठी उत्तम निचरा होणारी जमीन तसेच सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध आणि सुपीक मातीची गरज असते. ही शेती करण्यासाठी 5.5 आणि 6.7 मधील पीएच पातळी ची गरज असते.
लागवड: पार्सले शेती करण्यासाठी बियांचा वापर केला जातो. लहान बिया उगवायला दोन ते तीन आठवडे लागतात नंतर लावणी साठी बियाणे थेट तयार कराव्या लागतात. हे सर्व करत असताना 70 ⁰F (21⁰C)
महत्त्वाच्या टिप्स
ही शेती करताना दिवसाच्या सर्वात उष्ण भागात अंशिक सावली मिळेल असे स्थान निवडा.
6 ते 8 इंचापर्यंत माती मोकळी करा.
माती समृद्ध करण्यासाठी कंपोस्ट आणि जुने खतांचा वापर करावा.
बिया फिरताना हलक्या हाताने दाबा.
माती ओलसर ठेवण्यासाठी नियमितपणे पाणी द्या.
कोणती काळजी घ्यावी:
रोप उगवल्यानंतर त्यांना चार ते सहा अंतरावर ठेवणे.
नियमितपणे पाणी देणे.
महिन्यातून एकदा तरी संतुलित खताचा वापर करणे.
रोपाचे रक्षण करण्यासाठी कीटक आणि रोगप्रतिकारक गोष्टींचा वापर करणे.
कापणी कशी करावी:
एकदा झाड सहा ते आठ उंच झाल्यावर पानांची कापणी केली जाऊ शकते.